करंजखेड फाटा येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:37 IST2017-09-05T00:37:45+5:302017-09-05T00:37:45+5:30

वणी : करंजखेड येथील युवकाचा घातपात झाल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाटा येथे रास्ता रोको करुन संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

 Stop the road at Karanjkhed Phata | करंजखेड फाटा येथे रास्ता रोको

करंजखेड फाटा येथे रास्ता रोको

वणी : करंजखेड येथील युवकाचा घातपात झाल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाटा येथे रास्ता रोको करुन संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रविवारी रात्रीच्या सुमारास धनराज गावित, (२७), रा. करंज खेड या युवकाचा मृत्यू झाला. युवकाला वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्या दरम्यान मयताचे नातेवाईक, परिचित व ग्रामस्थांनी रु ग्णालय परिसरात गर्दी केली. मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष का ढण्यात आला. दरम्यान, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने धनराज गावित यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढ़े आली. मात्र त्याने नातेवाइकांचे समाधान झाले नाही घटना घडतेवेळी मयत धनराज यांच्यासमवेत असलेल्यांची चौकशीची मागणी पुढ़े आली. अंत्यसंस्कारानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास करंजखेड फाटा परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. सुमारे अडीच तास हा रास्ता रोको सुरू होता. यामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलीस उपअधिक्षक देवीदास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत चौकशीची भावना समजावून घेतली . वाहनांच्या लांबच लांब दोन्ही बाजूस लागल्या होत्या.

Web Title:  Stop the road at Karanjkhed Phata