उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात कालच्या बाजारभावाच्या तुलनेत ३०० रु पयांची घसरण झाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी लिलाव बंद पाडत आग्रा महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. मंगळवारी येथील बाजारात लाल कांद्याचे दर साधारणत: ९०० रु पयांपर्यंत होते. परंतु आज सकाळी लिलाव सुरु झाला तेव्हा बाजारभावात तब्बल ३०० रु पयांची घसरण होत भाव ५०० ते ६०० रु पये झाल्याने संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडत तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासन, पोलीस यंत्रणा व महसुल यंत्रणेची धांदल बघायला मिळाली. यावेळी महामार्गावर शेतकºयांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती.
उमराणेत कांदा भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको, लिलाव बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:23 IST