दिंडोरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा रास्ता रोको
By Admin | Updated: August 16, 2016 22:35 IST2016-08-16T22:34:38+5:302016-08-16T22:35:06+5:30
दिंडोरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा रास्ता रोको

दिंडोरी येथे ज्येष्ठ नागरिकांचा रास्ता रोको
दिंडोरी : आमदारांना पगारवाढ, पेन्शनवाढ मग ज्येष्ठ नागरिकांना का नाही, असा सवाल करत दिंडोरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी दिंडोरी येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मंगळवारी (दि. १६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फेज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी विविध आंदोलने करण्यात आली; मात्र फक्त आश्वासने मिळाली, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यावेळी नायब तहसीलदार लचके यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात अध्यक्ष शंकरराव वडजे, उपाध्यक्ष सन्तू मोरे, त्र्यंबकराव बस्ते, सचिव एस. के. पाटील, कोशाध्यक्ष किसनराव सातपुते, सहसचिव दगू राजदेव, प्रमोद अपसुंदे, एकनाथ दौंड, माजी जि. प. सदस्य एकनाथ हिंडे, माजी पं. स. सदस्य मनोहर मोरे, मनोहर ढाकणे, कमळाबाई भोये आदिंसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली होती. (वार्ताहर)