शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:53 IST2020-02-10T15:52:48+5:302020-02-10T15:53:12+5:30
देवळा : कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी हया मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विंचूर प्रकाशा महामार्गावर पाच कंदील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल.े यावेळी संघटनांच्यावतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

पाच कंदील चौकात रास्ता रोको आंदोलन करतांना शेतकरी संघटनेचे जयदीप भदाणे, कृष्णा जाधव, कुबेर जाधव दशरथ पुरकर, आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते .
केंद्राने नुकताच आंध्र प्रदेशातील केपी ओनियन ला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांदा उत्पादक महाराष्ट्र राज्य असून येथे चांगल्या पद्धतीचे कांदा उत्पादन येते. तरी महाराष्ट्रातील शेतकº्यांवर अन्याय का ? जी तत्परता भाव वाढ झाल्यावर केंद्र सरकार दाखवते, ती भाव कमी झाल्यावर का दाखवत नाही? नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते आगामी काळात ५१ लाख मेट्रिक टन कांदा विक्र ीस येणार आहे. अशा परिस्थितीत केंद्राने तात्काळ निर्यात खुली करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेश वारीसाठी मुक्त केले पाहिजे. तसे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात याहीपेक्षा मोठी आंदोलन करण्यात येईल असे तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाणे, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर, राजू शिरसाट, कुबेर जाधव, दशरथ पुरकर, विनोद आहेर, बापू देवरे, भाऊसाहेब मोरे, युवराज देवरे, हरिसिंग ठोके, रामकृष्ण गाढे, हितेंद्र आहेर, रामदास पवार, कुणाल शिरसाट, पोपट देवरे, , शेखर वाघ, अभिमान आहेर, भाऊसाहेब भालेराव, दिनेश सोनवणे, प्रकाश कोठावदे, आनाजी अिहरे, अभिमन आहेर, आदींसह कार्यकर्ते व कांदा उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
-