त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: May 29, 2017 13:15 IST2017-05-29T13:15:18+5:302017-05-29T13:15:18+5:30
त्र्यंबकेश्वर -कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जात आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर -कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जात आहेत. शासनाला इशारा देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी तसेच सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी तुपा देवी येथे आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको केला.यावेळी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्यासाठी एकमुखी शपथ घेतली.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, शिवसेना शहर संपर्क प्रमुख भूषण अडसरे, शेतकरी नेते ज्ञानेश्वर सोनवणे, ग्राहक सेना अध्यक्ष शिवाजी कसबे, संतोष मिंदे, शांताराम पोरजे, श्रीराम कोठुळे,भाऊसाहेब कोठुळे आदी उपस्थित होते.