जिल्ह्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:50 PM2018-01-31T23:50:27+5:302018-02-01T00:01:36+5:30

डिझेल व पेट्रोल दरवाढ, कांदा निर्यातशुल्क, शेतमाल आॅनलाइन खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Stop the NCP route in the district | जिल्ह्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

Next

नाशिक : डिझेल व पेट्रोल दरवाढ, कांदा निर्यातशुल्क, शेतमाल आॅनलाइन खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
देवळा : येथे रास्ता रोको आंदोलन करत तहसीलदार परदेशी यांना दिलेल्या निवेदनात, डिझेल-पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. शेतमालाची हमीभावाची (मका, तूर, सोयाबीन) आॅनलाइन खरेदी बंद झाल्याने त्यांच्या भावात घसरण झाली असून, शासनाने आॅनलाइन नोंदणी बंद केल्यामुळे मक्याचे दर आधारभूत किमतीवरून खुल्या बाजारात ९०० ते १००० रुपयांवर आले आहेत. तसेच कांदा पिकावरील निर्यात शुल्क जास्त असल्याने कांदा भावातही मोठी घसरण होऊ लागली असून, कांदा पिकावरील निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मका, तूर, सोयाबीन आॅनलाइन खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नायब तहसीलदार परदेशी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश अहेर, जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, उमराणे बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, उषा बच्छाव, जगदीश पवार, सुनील अहेर, जितेंद्र अहेर, नारायण रणधिर, राजेश अहेर, भाऊसाहेब पगार, अतुल अहेर, सचिन सूर्यवंशी, अनिल अहेर, सुशील देवरे, सुधाकर पवार, दिलीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
रस्त्याच्या दुतर्फा रांगा
देवळा आणि सटाणा येथे झालेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या  दुतर्फा रांगा लागल्या होत्या. शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या तर त्याला राज्य व केंद्र शासन जबाबदार राहील. हे सर्व प्रकार होऊ नये म्हणून डिझेल, पेट्रोलचे दर त्वरित कमी करावेत या मागण्यांचा समावेश आहे.
सटाण्यात चक्का जाम
सटाणा : कांदा निर्यातमूल्य शून्य करण्याबरोबरच इंधनाचे वाढते दर कमी करावेत, अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी बसस्थानकासमोर ठिय्या देऊन साक्र ी-शिर्डी महामार्ग तब्बल एक तास रोखून धरला. दरम्यान, प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मोदी सरकारविरु द्ध घोषणाबाजी करत येथील ठिय्या देऊन साक्र ी शिर्डी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. मोदी सरकार आल्यापासून प्रचंड महागाई वाढली आहे. इंधनाचे भाव गगनाला भिडल्याचा हा परिणाम आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा भयावह परिस्थितीत कांदा पिकाला थोडाफार भाव मिळत असताना अचानक मोदी सरकारने निर्यातमूल्य वाढवून कांद्याचे भाव पाडून शेतकºयाच्या तोंडातला घासच हिरावण्याचे पाप केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. शासनाने इंधनाचे दर तत्काळ कमी करून महागाई कमी करावी. तसेच कांदा निर्यातमूल्य शून्य करावे, वाढती महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, वाढीव स्टॅम्प मूल्य कमी करावे आदी मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल बच्छाव, जयवंत पाटील, संजय चव्हाण यांचीही यावेळी भाषणे झालीत. याप्रसंगी प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Stop the NCP route in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.