सटाण्यात राष्टÑवादीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:14 IST2017-10-05T23:29:15+5:302017-10-06T00:14:25+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच चुकीची व अन्यायकारक शेतकरी कर्जमाफी आणि विजेच्या वाढत्या भारनियमनच्या निषेधार्थ आज दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या देऊन एक तास साक्री शिर्डी महामार्ग रोखून धरला.

सटाण्यात राष्टÑवादीचा रास्ता रोको
सटाणा : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच चुकीची व अन्यायकारक शेतकरी कर्जमाफी आणि विजेच्या वाढत्या भारनियमनच्या निषेधार्थ आज दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या देऊन एक तास साक्री शिर्डी महामार्ग रोखून धरला. दरम्यान, आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी वीज महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले. वाढती महागाई कमी करावी, घरगुती गॅस व इंधन दरवाढ कमी करावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी व विजेचे भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शहरात चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र एक महिना उलटूनही आंदोलनाची दखल न घेतल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी आमदार संजय चव्हाण, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी आज दुपारी मोदी सरकारच्या विरु द्ध घोषणाबाजी करत शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ साक्र ी-शिर्डी महामार्गावर ठिय्या देऊन वाहतूक अडवून धरली. खेमराज कोर, विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, राजेंद्र सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विनोद चव्हाण यांना दिले. आंदोलनात रेखा शिंदे, वसंतराव पवार, जिभाऊ सोनवणे, डॉ.व्ही.के. येवलकर, झिप्रू सोनवणे, ज.ल. पाटील, जयवंत पवार, गिरीश भामरे, हरी मोरे, दीपक रौंदळ, राजेंद्र रौंदळ, केशव सोनवणे, नानाजी दळवी, ज्ञानेश नंदन, वसंतराव भामरे, संदीप साळवे, सुरेखा बच्छाव, उषा भामरे, वंदना भामरे सहभागी झाले होते.