शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गोदा-नंदिनीतील सांडपाणी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:15 IST

गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेला दिले आहेत. याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे.

नाशिक : गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेला दिले आहेत. याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे.  नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनात झालेल्या बैठकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महापालिकेच्या अधिकाºयांना याबाबत आदेशित केले. गेल्या तीन वर्षांपासून आमदार वारंवार पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या सहा महिन्यांत सदर सांडपाणी रोखावे. ही अखेरची मुदत असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत सीईटीपी उभारणी बाबत फरांदे यांनी विचारणा केली असता त्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर केला नसल्याचे समोर आले. सातपूर औद्योगिक वसाहतीत २७४ कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत ४०४ कारखाने सुरू असताना औद्योगिक विकास महामंडळाने सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही, हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणेकामी औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना सूचना देण्याचे अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले. बैठकीला अवर मुख्य सचिव गवई, डॉ. अमर सुपाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके, नाशिक महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे आदींसह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण