दिंडोरीत रास्ता रोको
By Admin | Updated: September 16, 2015 00:01 IST2015-09-15T23:59:44+5:302015-09-16T00:01:12+5:30
आंदोलन : नाशिक-कळवण महामार्गावरील वाहतूक ठप्प

दिंडोरीत रास्ता रोको
दिंडोरी : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन केले असून, सरकारने त्वरित निर्णय घेत संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कादवाचे अध्यक्ष तथा साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली आहे.
मंगळवारी (दि.१५) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी येथे कादवा कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता नाशिक-कळवण महामार्गावर सुमारे दीडतास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सुमारे ८००हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व सुटका केली.
यावेळी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करताना श्रीराम शेटे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि सरकारने केलेले दुर्लक्ष अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्त्या करणार नाही तर काय करतील, असा जळजळीत सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. तसेच आत्महत्त्या हा पर्याय नाही तेव्हा थोडं सबुरीनं घ्या, असा सल्लादेखील त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. कृउबाचे सभापती दत्तात्रय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे दिंडोरी रायुकाँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, आनंद चौधरी, शोभा मगर, शेतकरी नेते भास्कर गोडसे, रघुनाथ पाटील आदिंनी आंदोलकाना मार्गदर्शन केले.यावेळी दुपारी दीडच्या पोलिसांनी दोन वाहनांतून नेत्यांना अटक केली, तर काही कार्यकर्त्यांनी स्वत: अटक करवून घेतली. अॅड. दीपक बलकवडे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, शोभा मगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दत्तात्रय पाटील, विश्वास देशमुख अनिल देशमुख, कैलास मवाळ, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, संगीता राऊत, अलका चौधरी, विलास कड, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, रामदास पिंगळ, त्र्यंबक संधान, सचिन देशमुख, श्याम हिरे, संपत कड, भास्कर गोडसे, विश्वास देशमुख आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)