येवल्यात सीएए कायद्याच्या विरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:58 PM2020-01-24T22:58:04+5:302020-01-25T00:22:24+5:30

लोकविरोधी धोरणांपासून देशाला वाचविण्यासाठी व सीएए, एनआरसी कायद्यास विरोध करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, कामगार युनियन व डाव्या चळवळीच्या संघटनांच्या वतीने येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop coming up against CAA law when it comes | येवल्यात सीएए कायद्याच्या विरोधात रास्ता रोको

येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलनात सहभागी भाऊसाहेब अहिरे, सविता धिवर, विनोद गोतीस, संतोष जोंधळे, पोपट खंडांगळे, जितेश पगारे, आकाश पडवळ आदी.

Next
ठळक मुद्देनिदर्शने : वंचित बहुजन आघाडी, भारिप, कामगार युनियनचे तहसीलदारांना निवेदन

येवला : लोकविरोधी धोरणांपासून देशाला वाचविण्यासाठी व सीएए, एनआरसी कायद्यास विरोध करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, कामगार युनियन व डाव्या चळवळीच्या संघटनांच्या वतीने येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भारिपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. खर्च चालविण्यासाठी लागणारा निधी नसल्यामुळे सरकारने देशाच्या राखीव पुंजीला हात घातला आहे. खासगी उद्योग नफ्यात चाललेले आहे. भारतीय उद्योग खासगी व परदेशी भांडवलदारांना विकायला काढले आहेत. तसेच सीएए, एनआरसी, एनपीआर यांसारखे संविधानविरोधी कायदे व धोरणांची घोषणा सरकारने केलेली आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची मागणी सरकार करत आहे. देशातील हिंदू-मुस्लीम, आदिवासी, दलित, भटके-विमुक्त पोटासाठी भटकणारी स्थलांतरित अशा ४० टक्के नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यांच्याकडून भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व व समान अधिकार काढून घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आक्र ोश निर्माण झाला आहे. यावर उपाययोजनेची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रास्ता रोको आंदोलनात विनोद गोतीस, संतोष जोंधळे, पोपट खंडांगळे, जितेश पगारे, आकाश पडवळ, सविता धिवर, रेखा साबळे, अक्षय कर्डक, दयानंद जाधव, शरद अहिरे, समाधान धिवर, आनंद शिंदे, कुणाल निंदाने, शेख सलील, गौतम घोडेराव, संकेत घोडेराव आदी सहभागी झाले होते.

इगतपुरी येथे व्यावसायिकांनी पाळला कडकडीत बंद
इगतपुरी : सीएए कायदास विरोध दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला सर्व स्तरातील व्यावसयिकांनी प्रतिसाद देत शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळला. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्र म जगताप, शहराध्यक्ष सचिन चोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. युवा तालुकाध्यक्ष किशोर भडांगे, ज्येष्ठ नेते नंदू पगारे, शहर उपाध्यक्ष आनंद देहाडे, महिला तालुकाध्यक्ष अर्पिता रुपवते, रंजना साबळे, सुरेखा मोरे, करुणा बर्वे, महेश पगारे, अमोल जगताप, मनोज मोरे, कांतीलाल गरुड, अविनाश तेलोरे, गजेंद्र बर्वे, भूषण पंडित आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Stop coming up against CAA law when it comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप