स्वस्त धान्य दुकानांवर साखर, रॉकेल बंद
By Admin | Updated: July 16, 2017 00:03 IST2017-07-16T00:03:10+5:302017-07-16T00:03:25+5:30
नाशिक : स्वस्त धान्य दुकानांतून गोरगरिबांना साखर, रॉकेल मिळत होते. परंतु आता सदर पुरवठा बंद करण्यात आला असून, तांदूळदेखील १५ किलोऐवजी तीन किलोच मिळत असल्याने त्यांची उपासमार होत आहे.

स्वस्त धान्य दुकानांवर साखर, रॉकेल बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वस्त धान्य दुकानांतून गोरगरिबांना साखर, रॉकेल मिळत होते. परंतु आता सदर पुरवठा बंद करण्यात आला असून, तांदूळदेखील १५ किलोऐवजी तीन किलोच मिळत असल्याने त्यांची उपासमार होत आहे. सदर अन्याय दूर करून पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे. गोरगरिबांना स्वस्त दरात साखर, रॉकेल हे पूर्वी मिळत होते. परंतु सध्या सदर पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून के शरी शिधाधारकांना कुठल्याही प्रकाराचे धान्य मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय शिधापत्रिका-धारकांचे तांदूळ १५ ऐवजी ३ किलो करण्यात आले आहेत. तसेच आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने स्वस्त तसेच साखर व रॉकेल पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यासंबंधी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने जिल्हाधिकारी बी. राधाकृ ष्णन यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर सचिन जाधव, रणजित परदेशी, अण्णा मोरे, मुन्ना ठाकूर, मनोज करमासे, योगेश परदेशी, विजय बढे, दीपक भालेराव, दत्ता कासार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.