काळखोडे फाटा येथे विद्यार्थ्यांचा बस रोको
By Admin | Updated: July 1, 2016 00:23 IST2016-06-30T23:30:33+5:302016-07-01T00:23:19+5:30
काळखोडे फाटा येथे विद्यार्थ्यांचा बस रोको

काळखोडे फाटा येथे विद्यार्थ्यांचा बस रोको
तळेगाव रोही : चांदवड
तालुक्यातील काळखोडे फाटा येथे विद्यार्थ्यांनी बस रोको आंदोलन
केले.
लासलगाव आगाराची वाहेगावसाळ, काळखोडे, रेडगाव खुर्दमार्गे चांदवड बस सुरू करावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असून, मध्यंतरी ही बस सुरू झाली. मात्र ती पुन्हा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गुरुवारी (दि. ३०) सकाळी ७ वाजता बस रोको आंदोलन
केले.
या भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करत
असल्याने त्यांची गैरसोय होते. तरी बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)