शेतकऱ्यांच्या वतीने एरंडगावला रास्ता रोको
By Admin | Updated: April 2, 2016 23:48 IST2016-04-02T23:36:38+5:302016-04-02T23:48:31+5:30
शेतकऱ्यांच्या वतीने एरंडगावला रास्ता रोको

शेतकऱ्यांच्या वतीने एरंडगावला रास्ता रोको
येवला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज देयके माफी, स्वामीनाथन आयोगाची अंमल-बजावणी करा, बियाणे, खते यांच्या वाढत्या किमतींवर निर्बंध घालणे, मराठा-धनगर आरक्षण, शेतकऱ्यांचे विविध कंपन्यांमध्ये गुंतलेले पैसे परत मिळावे, कांद्याला हमीभाव मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी तालुक्यातील एरंडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
सातवा वेतन आयोगाचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याचीही मागणी केली आहे. निवेदनावर सुदाम पडवळ, प्रकाश पाबळे, विकास ठोंबरे, विजय मुळे, विजय भोजणे, शंकरराव मढवई, संदीप ठोंबरे, रावसाहेब आहेर, काकासाहेब पडवळ, बाबा मढवई, विलास रंधे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
निवेदनामध्ये सतत तीन वर्षापासूनचे अत्यल्प पर्जन्यमान त्यात सलग दुसरे दुष्काळी वर्ष यामुळे खचलेल्या शेतकर्यांना भरीस भर म्हणून अवकाळी पाऊस व गारपीटीच्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. कमी असलेल्या उपलब्ध पाण्यात
आणलेले पिकेही उत्पादनखर्चापेक्षांही कमी दराच्या संकटाला तोंड देत आहे.यामुळे शेतकरी उध्वस्त होत असून काही शेतकर्यांचे पैसे केबीसी,पर्ल्स,समृध्द जीवन, भाईचंद हिरांचंद मिल्चस्टेट सोसायटी यासारख्या कंपन्यामध्ये गुंतलेले असल्याने त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे , त्यातून शेतकरी वाचण्यासाठी मागण्या तातडीने मान्य करण्याचेही नमुद केले आहे . येवला तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे सुरु झालेली नाहीत.ती कामे सुरु करावीत .जनावरांना चारा छावण्या सुरु कराव्यात.प्रलंबित मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने निर्णय घ्यावा.अशी मागणीही निवेदनात केली आहे.