खासगी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन थांबवा सभापती उषा बच्छाव यांचे अध्यक्षांना साकडे
By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:13:43+5:302014-11-21T00:34:54+5:30
खासगी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन थांबवा सभापती उषा बच्छाव यांचे अध्यक्षांना साकडे

खासगी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन थांबवा सभापती उषा बच्छाव यांचे अध्यक्षांना साकडे
नाशिक : खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची समायोजन प्रक्रिया केवळ नाशिक जिल्'ातच सुरू असून, ती तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सध्या खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया सुरू आहे. सन २०१२ मध्ये सर्व शाळांची एकाच दिवशी पटपडताळणी करण्यात येऊन पटसंख्येच्या आधारे समायोजन करण्याची कार्यवाही फक्त नाशिक जिल्'ात करण्यात येत असून, नाशिक वगळता अन्य जिल्'ांत समायोजन करण्यात येत नाही, असे कळते. तसेच शासनाचेसुद्धा शिक्षक समायोजन करण्याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत. जिल्'ातील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया तत्काळ थांबविण्याबाबत आपल्या स्तरावरून माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना आदेश द्यावेत, अशी मागणी समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे. (प्रतिनिधी)