शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘तोंडावर मास्क लावा’ असे सांगणाऱ्या पोलिसावर भिरकावले दगड अन् फाडली वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:57 IST

कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देम्हसरूळ पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घरी परतत असताना वाटेत सार्वजनिक ठिकाणी चौघांचे टोळके मास्कविना सर्रासपणे वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या कर्मचा-याने त्यांना समज देत ‘तोंडावर मास्क, रूमाल लावा’ असे सांगताच त्याचा राग मनात धरून त्यांनी पोलिसावर दगड भिरकावले तसेच वर्दीचेही नुकसान केल्याची घटना घडली.म्हसरूळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिपाई फिर्यादी जिभाऊ चौरे हे आपल्या घरी जात असताना रस्त्यात त्यांना संशयित आरोपी धनराज गोकुळ लांडे, सुशांत संतोष खरे, फैजल कयूम शेख आणि विठ्ठल राजाराम साळवे हे चौघे विना मास्क वावरत असल्याचे लक्षात आले. सध्या कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द पोलीस, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जात आहे. दरम्यान, या चौघांना या आदेशाचे पालन करण्याबाबत चौरे यांनी सांगितले असता, चौघांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दिशेने रस्त्यालगत पडललेले दगड उचलून भिरकावले. यावेळी ते जखमी झाले. तसेच्या त्यांच्या अंगावर धावून जात वर्दीचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चौरे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी या चौघांविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक एस.वाय.पाटील हे करीत आहेत. 

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी