गोदावरी मंदिराच्या प्रांगणात गंगाद्वारवरील दगड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 01:02 IST2021-07-14T23:49:30+5:302021-07-15T01:02:46+5:30
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील गंगाद्वार या पहाडावर पावसामुळे काही दगड गोदावरी मंदिराच्या प्रांगणात ढासळून पडल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. एरव्ही गर्दी असणाऱ्या या मंदिरात सुदैवाने कुणीही नसल्याने दुर्घटना घडली नाही.

गोदावरी मंदिराच्या प्रांगणात कोसळलेले दगड.
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील गंगाद्वार या पहाडावर पावसामुळे काही दगड गोदावरी मंदिराच्या प्रांगणात ढासळून पडल्याची घटना बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. एरव्ही गर्दी असणाऱ्या या मंदिरात सुदैवाने कुणीही नसल्याने दुर्घटना घडली नाही.
त्र्यंबकेश्वर नजीक असलेल्या ब्रह्मगिरी व गंगाद्वार पहाडावर गोदावरीची मंदिरे आहेत. बुधवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू असताना अचानक गंगाद्वार पहाडावरील माती पावसाने वाहून गेल्याने मोकळे झालेले दगड खाली मंदिराच्या प्रांगणात पडले. या दगडांचे छोटे-छोटे तुकडे झाले. गोदावरी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरासमोर दर्शनार्थींची रांग असते. पण सुदैवाने या ठिकाणी कोणीही नव्हते. पुजारीदेखील नव्हते. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले, यास भूस्खलनही म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात दोन तीन दगड पडले. यातील एक दगड समोर असलेल्या कुंडाच्या पायरीवर पडल्यामुळे कुंडाचे नुकसान झाले आहे. या दगडांच्या भोवताल माती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे दगड मोकळे झाले. यास दरड कोसळणे असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. वनविभागाकडून दगड उचलण्याचे काम चालू असून साफसफाईदेखील करण्यात येईल असेही भदाणे यांनी म्हणाले.