खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी दगडगोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:13 IST2017-10-24T23:34:04+5:302017-10-25T00:13:57+5:30
पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी डांबराच्या मटेरिअलऐवजी मुरूम व दगडगोटे वापरले जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्व रस्त्यांचे खड्डे हे योग्य डांबरमिश्रित मटेरिअलने बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी दगडगोटे
पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी डांबराच्या मटेरिअलऐवजी मुरूम व दगडगोटे वापरले जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्व रस्त्यांचे खड्डे हे योग्य डांबरमिश्रित मटेरिअलने बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाथर्डी फाटा चौकाजवळ हॉटेल गारवाच्या समोरचा समांतर रस्ता काही दिवसांपूर्वी एका कंपनीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. त्यातून निघालेल्या मातीनेच तो बुजविण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून जाऊन व उरलेली माती खाली दबून रस्त्याला आडवी चारी पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून वाहन व वाहनांवरील लोकांना इजा होऊ लागल्या होत्या. हा अतिशय वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्यावरचे हे खड्डे त्रासदायक ठरत होते. यावर यंत्रणेने मजेशीर उपाय शोधत ओला मुरूम व दगडगोट्यांनी हे खड्डे बुजविले. हाच मुरूम नंतर रस्त्यावर पसरवून अपायकारक ठरणार असल्याने येथे व प्रभागातील अन्य ठिकाणीही डांबरमिश्रित मटेरियल टाकून खड्डे बुजवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.