नाशिकमध्ये एकाचा दगडानं ठेचून खून
By Admin | Updated: June 22, 2016 17:45 IST2016-06-22T17:42:14+5:302016-06-22T17:45:27+5:30
पंचवटीतील हनुमानवाडी येथे 27 मे रोजी सराईत गुन्हेगारांनी सुनील वाघ या युवकाचा लोखंडी दांडके आणि दगडाने खून केला होता.

नाशिकमध्ये एकाचा दगडानं ठेचून खून
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - पंचवटीतील हनुमानवाडी येथे 27 मे रोजी सराईत गुन्हेगारांनी सुनील वाघ या युवकाचा लोखंडी दांडके आणि दगडाने खून केला होता. या खुनातील फरार संशयित कुंदन परदेशी, अजय बोरिसा या दोघांना पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि. 21) रात्री अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हनुमानवाडी येथील बांधकाम व्यावसायिक गायकवाड याच्या घरासमोर गोळीबार करणाऱ्या अक्षय इंगळे याच्याकडून एक गावठी कट्टाही जप्त केला असून, त्यालाही 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.