सायखेडा : चांदोरी येथील राजवाड्यातील भरवस्तीत दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक तातडीने दुचाकीवरून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात सायखेडा पोलिसांनी पंचनामा केला आहे.देवेंद्रकुमार पगारे हे आपल्या बजाज कंपनीच्या प्लॅटिना गाडीवर गावात कामानिमित्त गेले होते. गावातून आल्यानंतर त्यांनी आपल्या घरासमोर गाडी उभी करून ते खाली उतरले. गाडी उभी करून घरात जाताच बाहेर मोठा आवाज आला. बाहेर येऊन पाहतो तो गाडीने पेट घेतला होता. आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ येऊन गाडीवर पाणी, माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीत पेट्रोल जास्त असल्यामुळे गाडीने अधिक पेट घेतला. त्यात सदर दुचाकी पूर्ण जळून खाक झाली. यासंदर्भात सायखेडा पोलीस स्टेशनला कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पुढील तपास कर्मचारी मुंडे करत आहे.(३० सायखेडा १)चांदोरी येथे पेटलेली दुचाकी.
चांदोरी येथे दुचाकीने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:51 IST
सायखेडा : चांदोरी येथील राजवाड्यातील भरवस्तीत दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक तातडीने दुचाकीवरून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात सायखेडा पोलिसांनी पंचनामा केला आहे.
चांदोरी येथे दुचाकीने घेतला पेट
ठळक मुद्देगाडीवर पाणी, माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला,