शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील महिलेची  पर्स चोरीस; रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:20 IST

नाशिकरोड बसस्थानकातून बसने कोपरगावला जाणाऱ्या महिला प्रवाशाची ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली हॅन्डपर्स चोरट्याने हातोहात चोरून नेली.

नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकातून बसने कोपरगावला जाणाऱ्या महिला प्रवाशाची ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली हॅन्डपर्स चोरट्याने हातोहात चोरून नेली. रेल्वे व बसस्थानक परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटना प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.कोपरगावातील गांधी चौक कापड बाजार येथील ज्योत्स्ना पुरुषोत्तम पगारे (५३) या रविवारी दुपारी औरंगाबादरोड येथील मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न समारंभ आटोपून दुपारी चार वाजता नाशिकरोड बसस्थानकातून कोपरगावला जाणाºया बसमध्ये पगारे बसल्या. यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा पगारे यांच्या जवळील अडीच तोळ्याचा ६२ हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा नवरंग हार, २४०० रुपये रोख असा ऐवज असलेली हॅन्डपर्स हातोहात चोरून नेली. बसवाहक तिकीट काढण्यासाठी आला असता पगारे यांना हातातील हॅन्डपर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. रेल्वे व बसस्थानकांत सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून, दररोज छोट्या-मोठ्या चोºया होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसस्थानक आवारात असलेली पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी