चोरी करणाऱ्या सराईतास अटक

By Admin | Updated: August 9, 2016 01:27 IST2016-08-09T01:26:33+5:302016-08-09T01:27:05+5:30

चोरी करणाऱ्या सराईतास अटक

Stolen arms arrested | चोरी करणाऱ्या सराईतास अटक

चोरी करणाऱ्या सराईतास अटक


नाशिक : शेजारच्या जिल्ह्यात चोरी करून शहरात परतलेल्या पंचवटी येथील एका अट्टल चोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित करण रामकरण शर्मा (२५, रा़ संजयनगर, नाशिक) हा शहरात आल्याची माहिती मिळाली होती़ त्यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोेलिसी खाक्या दाखवितास त्याचे ठाणे जिल्ह्यातील अहवा येथे धाडसी चोरी केल्याची माहिती दिली़ शर्माकडून चोरीतील ३८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व पाच हजार रुपये रोख असा २६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, संजय पाठक, शरद सोनवणे, नीलेश काटकर, विजय टेमगर, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे, संदीप भुरे, गोविंद बस्ते यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Stolen arms arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.