जिल्ह्यात लसींचा साठा केवळ मंगळवारपर्यंतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:08 AM2021-04-19T01:08:21+5:302021-04-19T01:09:21+5:30

जिल्ह्यातील लसींचा साठा रविवारी संपुष्टात येत असतानाच पुन्हा १६ हजार लसींचा साठा जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अजून किमान २ दिवस पुरेल इतका लसींचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार, याची प्रशासनालादेखील माहिती नाही. 

Stocks of vaccines in the district only till Tuesday! | जिल्ह्यात लसींचा साठा केवळ मंगळवारपर्यंतच !

जिल्ह्यात लसींचा साठा केवळ मंगळवारपर्यंतच !

Next
ठळक मुद्देरविवारी नाशिकला मिळाल्या १६ हजार लस

नाशिक :  जिल्ह्यातील लसींचा साठा रविवारी संपुष्टात येत असतानाच पुन्हा १६ हजार लसींचा साठा जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अजून किमान २ दिवस पुरेल इतका लसींचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र, हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार, याची प्रशासनालादेखील माहिती नाही. 
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लस कितपत उपलब्ध होईल, त्याची माहितीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. सध्याच्या लसीकरणाचा वेग पाहता, नियमित लसीकरण सुरु ठेवल्यास ही लस सोमवारपर्यंत किंवा फार तर मंगळवारपर्यंतच पुरणार 
आहे. 
त्यानंतर पुन्हा त्वरित लस उपलब्ध झाली तरच लसीकरण सुरळीत सुरू राहणार आहे. अन्यथा पुन्हा नाशिकमधील लसीकरणात खंड पडण्याची भीती आरोग्य यंत्रनेकडून व्यक्त होत आहे.
लसीकरणासाठी रांगा
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाकडे पाहून घाबरलेल्या नागरिकांनी आता लसीकरणासाठी रांगा लावल्याचे  दिसून येत आहे. नागरिक नोंद केल्यानंतर सकाळी लवकरच रांगेत उभे राहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत तर ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकही दुसऱ्या लससाठी घाई करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Stocks of vaccines in the district only till Tuesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.