बोहरपट्टीजवळ पडल्या पोलिसांच्या लाठ्या-काठ्या
By Admin | Updated: May 1, 2017 01:48 IST2017-05-01T01:48:17+5:302017-05-01T01:48:27+5:30
अझहर शेख नाशिकस्वातंत्र्योत्तर काळ असूनही त्यावेळी संघर्षाची धग कायम होती... १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन राज्यभर पेटले तेव्हा नाशिकमध्येही सुमारे महिनाभर आंदोलन पेटले होते.

बोहरपट्टीजवळ पडल्या पोलिसांच्या लाठ्या-काठ्या
अझहर शेख नाशिक
स्वातंत्र्योत्तर काळ असूनही त्यावेळी संघर्षाची धग कायम होती... १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन राज्यभर पेटले तेव्हा नाशिकमध्येही सुमारे महिनाभर आंदोलन पेटले होते.... मेनरोड या बाजारपेठच्या ठिकाणी दुकानांची लूट झाल्यानंतर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबार केला. यावेळी चंदू तुरे यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. ही घटना आजही अंगावर शहारे आणते, अशा अनेक आठवणी आहेत. या आंदोलनात सहभाग असलेल्या असे स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील सहभागी पंडित नथूजी येलमामे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या संघर्षाला उजाळा दिला.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा नाशिकमध्येही लढला गेला. हा लढा लढणाऱ्या अनेकांपैकी येलमामे हे एक होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पेटून उठली. अवघा महाराष्ट्र मुंबईला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरला. नाशिकमध्येही आंदोलनाची धार तीव्र झाली होती. येलमामे यांचे वय तेव्हा वीस ते बावीस वर्षे होते. येलमामे यांनी नाशिकच्या नागरिकांसमवेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेत आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक नाशिककर रस्त्यावर उतरले होते. मेनरोड येथील चित्रमंदिर सिनेमाजवळ झालेल्या पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात चंदू तुरे यांना गोळी लागल्याने ते धारातीर्थ पडले. या घटनेनंतर नाशकातील आंदोलन अधिक तीव्र झाले. नाशकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी येलमामे यांच्यासह मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी बोहरपट्टीच्या वळणावर रोखले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर के ल्यानंतर कामकाजापर्यंत सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, क्रांतिवीर वसंतराव नाईक, गोविंदराव देशपांडे, वामनराव यार्दी, सदुभाई भोरे यांच्यासह आदि नेत्यांनी त्यावेळी पुढाकार घेऊन नाशिकच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन के ल्याचे येलमामे सांगतात.संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रह : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेले नाशिकमधील शिवाजीराव शेटे, कान्हु कुंभार, केशव सुतार, चंदू न्हावी, बाळासाहेब शेंडके, पंडित येलमामे आदि.