पाथरे ते शिर्डी साई पालखी उत्साहात
By Admin | Updated: April 16, 2016 22:19 IST2016-04-16T22:19:02+5:302016-04-16T22:19:31+5:30
पाथरे ते शिर्डी साई पालखी उत्साहात

पाथरे ते शिर्डी साई पालखी उत्साहात
पाथरे : येथील श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा भर उन्हातही उत्साहात पार पडली. पायी दिंडी सोहळ्याचे हे आठवे वर्ष होते.
पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द, वारेगाव, मीरगाव, माळवाडी, कोळगाव येथील सुमारे तीन हजार साईभक्त या पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रारंभी साई पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर सार्इंची भक्ती गिते, भजन व आरती तल्लीन होत नाचत गात भाविक शिर्डीत पोहोचले. पदयात्रेत सहभागी भाविकांना नास्ता, थंडपेय, दुपारचे जेवण, लिंबू सरबत देण्यात आले.
पाथरे बुद्रूकचे सरपंच मच्छिंद्र चिने, अमोल दवंगे, राजेंद्र बिडवे, संतोष ढवण, योगेश बिडवे, सुनील महाले, राजेंद्र बूब, संतोष बिडवे, गोविंद खेडकर, अनिल नरोडे, नितीन सोमवंशी, अनिल सोमवंशी, महेश तागड, विकास उगले, सतिष बुब, हर्षल पाटील यांनी पदयात्रेचे नियोजन केले. (वार्ताहर)