निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या घरी चोरी
By Admin | Updated: October 28, 2015 23:39 IST2015-10-28T23:38:35+5:302015-10-28T23:39:22+5:30
निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या घरी चोरी

निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या घरी चोरी
नाशिक : इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिक शहरात बरीच वर्षे वाहतूक विभागाची जबाबदारी सांभाळणारे संजीव ठाकूर (जगदीश बंगला, प्लॉट नंबर ३३, बजरंग सोसायटी, इंदिरानगर) यांच्या बंगल्याच्या खिडकीतून काठी वा गजाच्या साहाय्याने पूजेसाठी ठेवलेले ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरून नेले़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़