भादवण येथे भरदिवसा चोरी;

By Admin | Updated: July 29, 2014 00:55 IST2014-07-29T00:16:25+5:302014-07-29T00:55:22+5:30

चार तोळे सोने लंपास

Stealing a day-night at Bhadwana; | भादवण येथे भरदिवसा चोरी;

भादवण येथे भरदिवसा चोरी;

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने जबरीने घरात प्रवेश करून चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या सदरील घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
भादवण येथील शेतकरी प्रकाश जाधव हे पत्नीसह त्यांच्या व्याह्याकडे बाहेरगावी गेले होते तर मुलगा मित्रासमवेत सप्तशृंगी गडावर गेला होता. पिळकोस - बगडू रस्त्यावरील पुलालगत असलेल्या जाधव यांच्या मळ्यातल्या घरात त्यांची आई सिंधुबाई याच एकट्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक भामटा मोटारसायकलवर आला, आणि त्यांच्या मुलाचा मित्र असल्याचे सांगत त्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातल्या कपाटा असून ते घेण्यासाठी पाठविल्याचे सिंधुबाई यांना सांगितले. तरीही सिंधुबाई यांनी त्यास कपाटाकडे जाण्यास मज्जाव केला असता त्याने त्यांनाच लगतच्या खोलीत डांबले आणि कपाटाचे लॉकर तोडून आतील चार तोळे सोन्याचे दागिने, रोख दहा हजार रुपये घेऊन पलायन केले.
सदर घडलेला प्रकार सिंधुबाईनी शेजारील मळ्यातील शेतकऱ्यांना सांगितल्यावर घटनेची उकल झाली. प्रकाश जाधव यांना भ्रमणध्वनीवरून सदरची घटना कळविण्यात आली. याबाबत कळवण पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: Stealing a day-night at Bhadwana;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.