सीईओंचा खेड्यात मुक्काम

By Admin | Updated: May 25, 2014 00:20 IST2014-05-24T00:56:45+5:302014-05-25T00:20:53+5:30

गावाचे नाव गुप्त

Stay in the village of CEOs | सीईओंचा खेड्यात मुक्काम

सीईओंचा खेड्यात मुक्काम

गावाचे नाव गुप्त
नाशिक : राज्याचे मुख्य सचिव जे़ एस़ सहारिया यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर हे आज जिल्‘ातील एका खेडेगावात मुक्कामी गेले आहेत़ मात्र त्यांचा हा मुक्काम अचानक असल्याने गावाचे नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते़
आज दिवसभर जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाची ऑनलाइन बदली प्रक्रिया उरकून मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सायंकाळी ५.३० वाजता गावाकडे धाव घेतली़ त्यांच्या मुक्कामाच्या कालावधीत ग्रामसेवक, तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित नसल्यास थेट कारवाईची शक्यता असल्याने बहुतेक कर्मचार्‍यांनी आपली गावे जवळ केली होती़ बनकर हे संबंधित गावात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत़ तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत़ बनकर यांनी मुक्कामासाठी आदिवासी तालुक्यातील गावाची निवड करण्याची शक्यता जिल्हा परिषदेत वर्तविण्यात येत होती़

Web Title: Stay in the village of CEOs