मांगीतुंगी पवर्तावर १०८ फूट उंचीची मूर्ती
By Admin | Updated: July 28, 2014 00:41 IST2014-07-27T23:18:57+5:302014-07-28T00:41:24+5:30
मांगीतुंगी पवर्तावर १०८ फूट उंचीची मूर्ती

मांगीतुंगी पवर्तावर १०८ फूट उंचीची मूर्ती
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी पर्वतावर कोरण्यात येणाऱ्या विशालकाय ऋषभदेव भगवान यांच्या १०८ फूट पूर्वाभिमुख मूर्तीसाठी तपाच्या शोधकार्यानंतर अखंड पाषाण सापडला आहे. त्यामुळे या अखंड पाषाणात १०८ फुटाची मूर्ती आकार घेऊ लागली आहे. ही विशालकाय मूर्ती आशिया खंडात सर्वाधिक उंच मूर्ती ठरणार आहे.
ज्ञानमती माता यांच्या प्रेरणेने मांगीतुंगी ट्रस्टने ऋषभदेव भगवानची १०८ फूट मूर्ती निर्माण करण्याचे काम गेल्या २००२ मध्ये हाती घेतले होते. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंच असलेल्या मांगीतुंगी पर्वतावर नेमिनाथांची गुहा आहे. सुमारे ४५० फूट लांबी आणि ५५ फूट व्यासाचा हा पाषाण आहे. या अखंड पाषाणात राजस्थानचे प्रसिद्ध मूर्तिकार सूरजमल नाठा यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती कोरण्याचे काम सुरू झाले आहे. आशिया खंडात सर्वाधिक उंच ठरणाऱ्या या मूर्तीचे काम डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होईल, असे मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष डॉ. पन्नालाल पापडीवाल यांनी सांगितले.