संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: September 5, 2015 00:13 IST2015-09-05T00:12:36+5:302015-09-05T00:13:17+5:30

संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन

Static movement of computer operators | संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन

संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन

नाशिक : थकीत मानधन मिळण्याच्या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.४) जिल्हा परिषदेच्या प्रवेश द्वारासमोर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर धाव घेऊन प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विशेष म्हणजे शुक्रवारी (दि.४) भद्रकाली पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाच पोलिसांनी साकडे घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या आंदोलनात मध्यस्थी करीत आंदोलन मिटविल्याने पोलिसांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष धावून आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत विभागामध्ये संग्राम प्रकल्पांतर्गत काम करताना राज्यात नाशिक जिल्ह्याचे काम चांगल्या क्रमांकावर आहे. मात्र संग्राम कक्ष व ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना गेल्या काही महिन्यांपासून मानधन थकले आहे, त्यामुळे या संगणक परिचालक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्याची तक्रार आहे. दुपारपासून राज्य संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Web Title: Static movement of computer operators