रेशन दुकानांचा राज्यव्यापी बंद यशस्वी

By Admin | Updated: August 2, 2016 02:04 IST2016-08-02T02:03:42+5:302016-08-02T02:04:46+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प

Statewide closure of ration shops succeeded | रेशन दुकानांचा राज्यव्यापी बंद यशस्वी

रेशन दुकानांचा राज्यव्यापी बंद यशस्वी

नाशिक : रेशन दुकानदारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेशन व घासलेट विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी बंदमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प झाली असून, जिल्ह्यातील सहा हजारांहून अधिक दुकानदारांनी या संपात सहभाग नोंदविल्याचा दावा संघटनेने केला आहे.
तामिळनाडू राज्याप्रमाणे रेशन दुकानदाराला दरमहा ३० ते ३५ हजार रुपये पगार देण्यात यावा, घासलेट विक्रेत्यांचे पुनवर्सन करावे, दुकानदाराला धान्य हमाली व भाड्यासहीत दुकानपोच मिळावे, गाळाभाडे, लाईटबिल, स्टेशनरी खर्च याची तरतूद करण्यात यावी, दुकानदाराला शासकीय कामाची सक्ती करू नये, दुकानदाराला धान्य व किराणा माल विक्रीची अनुमती द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत दुकाने बंदची हाक संघटनेने दिली आहे. त्यानुसार सोमवारी एकही दुकानदाराने धान्याची उचल करण्यासाठी चलन भरले नाही, त्यामुळे एकही परमिट दिले गेले नाही. महिन्याच्या प्रारंभीच दुकाने बंद झाल्यामुळे विशेष करून ग्रामीण भागातील गोरगरिबांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात २६०९ रेशन व ३९९८ घासलेट विक्रेते असून, या सर्वांनी बंदमध्ये सहभाग नोंदविल्याने संपूर्ण वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Statewide closure of ration shops succeeded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.