पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील म्हसोबा चौकातील तीन नंबरचे दुकानदार हे सतत धान्य वाटप करताना लाभार्थींना अरेरावीची भाषा बोलत गरिबीची थटा उडवतात. सरकारकडून आलेल्या धान्याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात करतात. शासनाने नेमून दिलेल्या वेळेत दुकानदेखील उघडत नसल्याने कोरोनाच्या या महामारीत व लॉकडाऊनच्या काळात अनके लाभार्थींना राशन घेण्यासाठी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते. या रेशन धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर देवीदास वाघ, दत्तू झनकर, पप्पू वाघमारे, जितू वाघ,भावडू गांगुर्डे, रामदास गांगुर्डे, विक्रम धाडीवाल, माणिक वाघ, ज्ञानेश्वर लोखंडे, प्लवेश भोये आदीच्या स्वाक्षºया आहेत.
पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:44 IST
पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे.
पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन
ठळक मुद्देसरकारकडून आलेल्या धान्याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात करतात.