सप्तशृंगगड देवी मंदिर उघडण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:57+5:302021-08-13T04:17:57+5:30
सप्तशृंगीगड येथील स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ यांना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद असल्याने भाविक दर्शनासाठी ...

सप्तशृंगगड देवी मंदिर उघडण्यासाठी निवेदन
सप्तशृंगीगड येथील स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ यांना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद असल्याने भाविक दर्शनासाठी येऊ शकत नाही. या भाविकांवर स्थानिक आदिवासी बांधव, व्यापारी व इतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून असल्याकारणाने मंदिर बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे देवीचे दर्शन मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात यावे तसेच लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असल्याने मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यास येथील व्यावसायिकांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल व उपासमारी थांबेल. गड परिसरात या व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये ८८ टक्के कोविड-१९ लसीकरण झाले असून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात यावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करत सप्तशृंगीगडावरील सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, व्यावसायिक धनेश गायकवाड, निर्मल डांगे, लक्ष्मीकांत पाठक आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व मंदिरे खुली करण्यात यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, अन्यथा गाव सोडण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येईल, तसेच येथील व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी गृहकर्ज, व्यवसायासाठी कर्ज, बचतगट, वाहनकर्ज आदींसाठी लाखो रुपयांचे विविध बँकांकडून कर्ज घेतले असून दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत असून कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
एकीकडे बँकाही कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. यासाठी शासनाने लक्ष घालून मंदिरे सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
(१२ सप्तश्रृंग गड)
सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी सुरू करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रमेश पवार, संदीप बेनके, निर्मल डांगे, धनेश गायकवाड आदी.
120821\12nsk_8_12082021_13.jpg
सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी सुरू करावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रमेश पवार, संदीप बेनके, निर्मल डांगे, धनेश गायकवाड आदी.