इगतपुरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने कामबंद व आरोग्य अधिकारी घेराव आंदोलन करणार असल्याचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. देशमुख यांना देण्यात आले.राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचारी यांनी नियमित शासनसेवा समायोजन करीत दि. १९ मेपासून राज्यात विविध प्रकारे आंदोलने करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत टप्पाटप्प्याने प्रथम आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्यसेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे आणि शासन नियमाप्रमाणे समाविष्ट करावेआदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे.यावेळी समन्वयक संगीता सरदार, कुंदा राहारे, किरण शिंदे, मुख्य समन्वयक दिलीप उटाणे, बाजीराव कांबळे, अशोक जयसिंगपुरे, अरुण खरमाटे, वैशाली ढोणे, नूतन शिंदे, ए. ए. खेमनर, एस. एम. शिंदे, किशोर सोनवणे, टी. आर. चौधरी, आय. एस. चौधरी, प्रतिभा बागुल, छाया सोनवणे, जे. एन. घाणे, भारती वानखेडे, सविता थोरात, मंगेश डावरे, शकील शेख आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:29 IST