निराधार पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:34+5:302021-07-25T04:13:34+5:30
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामध्ये विधवा झालेल्या एकल महिला पुनर्वसनाबाबत तातडीने कृती करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना महिला पुनर्वसन समितीचे अंबादास केदारे, नलिनी ...

निराधार पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामध्ये विधवा झालेल्या एकल महिला पुनर्वसनाबाबत तातडीने कृती करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना महिला पुनर्वसन समितीचे अंबादास केदारे, नलिनी शार्दूल, दीपाली खेडकर, शिल्पा आग्निहोत्री यांनी दिले. महाराष्ट्रस्तरावर कोरोना कुटुंब पुनर्वसन समिती स्थापन झाली असून, १५० पेक्षा जास्त संस्था त्यात एकत्रित आल्या आहेत. या समन्वयाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना शेकडो ई-मेल केले आहेत, ज्यात अशा महिलांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. महिला बालकल्याण विभागाशी राज्यस्तरावर चर्चा सुरू असून, त्यांच्यासोबत कामही करीत असल्याची माहिती केदारे यांनी दिली.
-----------------------------
या आहेत मागण्या
जिल्ह्याबाहेर झालेले मृत्यू व घरी झालेले मृत्यू, अशा सर्व प्रकारच्या विधवांचा यात समावेश व्हावा. या महिलांची सामाजिक, आर्थिक स्थिती व समस्या लक्षात येण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांचे सर्वेक्षण आठ दिवसांच्या आत करावे. त्यामुळे तालुकानिहाय मृत्यू झालेल्यांच्या याद्या नाव, गाव व पत्त्यासह उपलब्ध करून द्याव्यात. या महिलांकडे अनेक कागदपत्रे नाहीत. शासकीय योजनांसाठी सर्व कागदपत्रे त्यांना तातडीने दिली जावीत. कागदपत्रांच्या अटी कमी करून तत्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे.
---------------------------------------------------
नाशिक जिल्ह्यातील महिला विधवा व निराधार पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अंबादास केदारे, नलिनी शार्दूल, दीपाली खेडकर, शिल्पा अग्निहोत्री आदी. (२३ एमएमजी ३)
230721\091223nsk_12_23072021_13.jpg
२३ एमएमजी ३