दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:39 PM2020-10-08T19:39:42+5:302020-10-09T01:06:03+5:30

दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.

Statement of Dindori Taluka Talathi Sangh to Tehsildar | दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

दिंडोरी तालुका तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

googlenewsNext
ठळक मुद्दे 03 आॅक्टोबरपासून वेबसाईट पूर्ण बंद आहे.

दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.
शासनाने आॅनलाईन सेवा चालू केली असली तरी त्यासाठी लागणारे इंटरनेट सेवा मात्र चांगल्या प्रतीचे दिले नाही त्यामुळे डिजिटल सेवा लोकांना डोकेदुखी तर ठरत नाही ना असा संशय व्यक्त करावा लागत आहे. शेतकरी खातेदार तलाठी कार्यालयात सातबारा उतारा मिळण्यासाठी चकरा मारतात. परंतु वेबसाईट बंद असल्याने उतारे मिळत नसल्यामुळे तलाठी यांना शेतकरी खातेदारांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तलाठी यांचे सर्व कामे संगणकीय आॅनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मागील आठ दिवसापासून ई-फेरफारसह सर्वच वेबसाईटला स्पीड नाही. तसेच 03 आॅक्टोबरपासून वेबसाईट पूर्ण बंद आहे. यात पुढील दोन दिवसात सुधारणा होण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. असे न झाल्यास तलाठ्यांना लोकांच्या रोषापासून वाचण्यासाठी सर्व तलाठी यांची डीजीटल सिग्नीचर तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. त्यास तलाठी जबाबदार राहणार नाही याची नोंद तहसील कार्यालयाने घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच मासिक वेतनाबाबत अडचणी, सातवा वेतन आयोग पडताळणीबाबत, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना गावे वाटप करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस आबासाहेब खेडकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार गोसावी, उपाध्यक्ष डी. बी. केसरे, सरचिटणीस किरण भोये, संघटक शरद गोसावी, तालुका संपर्क प्रमुख महेश भोये, शिवाजी भोये आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

 

Web Title: Statement of Dindori Taluka Talathi Sangh to Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.