पिंपळणारेच्या ग्रामसेवकाविरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:52+5:302021-04-15T04:13:52+5:30

निवेदनात म्हटले आहे, वाघचौरे यांनी पदभार घेऊन तीन महिने झाले आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे दप्तर दाखविले जात नाही व ...

Statement against Pimpalanare's Gram Sevak | पिंपळणारेच्या ग्रामसेवकाविरोधात निवेदन

पिंपळणारेच्या ग्रामसेवकाविरोधात निवेदन

निवेदनात म्हटले आहे, वाघचौरे यांनी पदभार घेऊन तीन महिने झाले आहे. मात्र, कुठल्याही प्रकारचे दप्तर दाखविले जात नाही व कार्यकारिणीची बैठकही घेतली जात नाही. याबाबत पूर्णपणे मनमानी कारभार चालू असून याबाबत वाघचौरे यांच्या कामकाजाबाबत लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे. मात्र, यावर कुठलीही चौकशी झालेली नाही. याचबरोबर या ग्रामसेवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमालाही पूर्वसूचना न देता दांडी मारल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच कविता साळुंखे, उपसरपंच अजित खांदवे, सदस्य सचिन साळवे, युवराज साळुंखे, सखाराम कडाळे, मनीषा शेखरे, कौशाबाई बेडकुळे, बेबी जाधव, सुनीता तांदळे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Statement against Pimpalanare's Gram Sevak