शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल शाळा साकारणार राज्यस्तरीय "मॉडेल स्कूल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:33 IST

अंदरसूल : शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यात ३०० शाळा ह्णआदर्श शाळाह्ण म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात येवला तालुक्यातील २३६ शाळा मधून अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळा अंदरसूल मुली या शाळेची राज्यस्तरीय मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच प्रा. विनिता अमोल सोनवणे यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२० च्या शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकान्वये दिली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्याचे करणार नेतृत्व : राज्यातील ३०० आदर्श शाळांमध्ये निवड

अंदरसूल : शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदशाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यात ३०० शाळा ह्णआदर्श शाळाह्ण म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात येवला तालुक्यातील २३६ शाळा मधून अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळा अंदरसूल मुली या शाळेची राज्यस्तरीय मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच प्रा. विनिता अमोल सोनवणे यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२० च्या शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकान्वये दिली आहे.अंदरसूल येथील १९३४ मध्ये स्थापना झालेली जिल्हा परिषदेची स्वतंत्र मुलींची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इ.१ ली ते ७ वी वर्ग आहे. शाळेची इयत्ता 3री च्या वर्गाच्या दोन तुकड्या असून इतर वर्गाची प्रत्येकी एक तुकडी आहे. इयत्ता पहिली ते सातवी चा पट २४० आहे. शाळेत मुख्याध्यापकासह ९ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थीनी वक्तृत्व, वैयक्तिक नृत्य, काव्यगायन स्पर्धेत तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. ग्रामस्थांचे सहकार्य आणि उपक्रमशील, मेहनती शिक्षकांमुळे शाळेचा गुणवत्तेचा आलेख नेहमी वाढता आहे. शाळेस स्वतंत्र संगणक कक्ष, जलशुध्दीकरण यंत्र, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वृक्षारोपण ङउऊ प्रोजेक्टर आदी सुविधा आहेत.

या शाळेची नुकतीच राज्यस्तरीय आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड झाली आहे. शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत अंदरसूल कडून मुलींचे शौचालय, ३ काँप्युटर, १ प्रिंटर, पाण्याच्या टाक्या, लेड टीव्ही, संपुर्ण शालेय रंगकाम अशी भरघोस मदत केली आहे तसेच शालेय आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे प्रस्तावित आहे जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून १ डिश टीव्ही प्रात झाला आहे.येवला तालुक्यातून राज्यस्तरीय मॉडेल स्कूल म्हणून एकमेव निवड झालेली अंदरसूल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ व लोक सहभागातून मदत झाली आहे.मॉडेल स्कूल... असे साकारणारया आदर्श शाळांमध्ये शासनाकडून सुस्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गुणवत्तेसाठी पूरक वातावरण तसेच भविष्यात मुलांसाठी वाहतूक व्यवस्था आदीसह इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता केली जाणार आहेत. यातून हे मॉडेल स्कूल साकारले जाणार आहेत.अंदरसूल जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक उत्साही व मेहनती आहेत. शासनाच्या या राज्यस्तरीय उपक्रमाची ते निश्चितच 100 टक्के प्रभावी अंमलबजावणी करून मॉडेल स्कूल साकारतील असा आशावाद आहे.- मनोहर वाघमारे, गटशिक्षणाधिकारी, येवलाजि. प.अंदरसुल मुली या शाळेची आदर्श शाळा म्हणून शासनाकडून निवड झाली ही गावासाठी खूप अभिमानाची बाब आहे. शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत अंदरसुल कडून शौचालय, 3 कॉम्पुटर, 1 प्रिंटर, पाण्याच्या टाक्या, लेड टीव्ही, संपूर्ण शालेय रंगकाम अशी मदत केली आहे. शालेय आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे प्रस्तावित आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा येवला तालुक्याचे आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मदतीने शाळेच्या विकासात तसेच आदर्श मॉडेल स्कूल साकारण्यात मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य नेहमी तयार आहोत.- प्रा. विनिता  सोनवणे, सरपंच, अंदरसुल ग्रामपंचायतराज्यातील 300 आदर्श शाळांमध्ये मॉडेल स्कूल येवला तालुक्यातून एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदरसुल मुली या शाळेची निवड झाली ही खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे .या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर राहील- बाबासाहेब बेरगळ, मुख्याध्यापक, जि. प.प्राथमिक शाळा अंदरसुल मुली 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा