मालेगावी ‘मध्य’मध्ये राज्यस्तरीय सभा; ‘बाह्य’कडे पाठ
By Admin | Updated: October 3, 2014 23:14 IST2014-10-03T23:13:18+5:302014-10-03T23:14:53+5:30
मालेगावी ‘मध्य’मध्ये राज्यस्तरीय सभा; ‘बाह्य’कडे पाठ

मालेगावी ‘मध्य’मध्ये राज्यस्तरीय सभा; ‘बाह्य’कडे पाठ
मालेगाव : बाह्य आणि मध्य मतदार-संघातील उमेदवार छाननी आणि माघारी नंतर तुल्यबळ लढतींचा प्रचार सुरू झाला आहे. मध्य मतदारसंघात दिग्गजांच्या प्रचारतोफा दणाणत असताना ‘बाह्य’मध्ये मात्र अद्याप एकाही राज्यस्तरीय नेत्याची प्रचारसभा झालेली नाही. यामुळे उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या भरवशावरच मतदारसंघ पिंजून काढावा लागत आहे.
मालेगाव मध्यमध्ये राकॉँ उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली. त्यापाठोपाठ राकाँत बंडखोरी करीत एमआयएममध्ये दाखल होऊन उमेदवारी करणाऱ्या अब्दुल मालिक शेख यांच्या प्रचारार्थ अकबरुद्दीन ओवेसी यांनीही सभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. बाह्यमध्ये सेना, मनसे, राकॉँ व भाजपा उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मतदारसंघ पिंजून काढावा लागत आहे. किंबहुना मनसेच्या उमेदवाराच्या प्राचारार्थ राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार असल्याचे समजते.