भोई समाजाचा राज्यस्तरीय मेळावा
By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-24T23:15:53+5:302016-01-25T00:10:07+5:30
भोई समाजाचा राज्यस्तरीय मेळावा

भोई समाजाचा राज्यस्तरीय मेळावा
सिडको : भोई समाजात शिक्षणाबरोबरच बेरोजगारांना नोकरी तसेच स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संघटित राहून लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी केले. अध्यक्षस्थानी मंगेश नेमाडे उपस्थित होते.
सिडको राणेनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात भोई समाज युवा मंच नाशिक जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावणे बोलत होते. व्यासपीठावर अभिनेते मोहन काळे, राष्ट्रीय संघटनमंत्री अनिल काश्यप, महापौर अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक सचिन भोर, माजी नगरसेवक सुमन सोनवणे आदि उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब तावडे, सत्यम शिंगाणे, रोहित शिंगाणे, ज्ञानेश्वर खैरमोडे, राहुल डहाके, उदयकुमार झावरे, गौरव ढोले, राहुल सोनवणे, नीलेश वाडीले, देवीदास लाड, चेतन घटमाळे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक विजय भांबरे यांनी, तर तुषार साटोटे, नीलेश वाडिले यांनी आभार मानले. (वार्ताहर)