मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन
By Admin | Updated: November 18, 2015 22:48 IST2015-11-18T22:47:33+5:302015-11-18T22:48:19+5:30
मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन

मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन
सिन्नर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या ५५व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. बदलापूर (ठाणे) येथे तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
यावेळी विविध शैक्षणिक विषय, मुख्याध्यापकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच शैक्षणिक शोधनिबंध, शैक्षणिक साहित्यप्रदर्शन, साहित्य विक्री स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन अशी विविध कार्यक्रमांची बौद्धिक पर्वणीच ठरणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उपसभापती वसंत डावखरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिक्षक आमदार रामनाथ मोते, कपिल पाटील, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत
होणार आहे. जिल्हाभरातील
जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे बी.एन. पवार, बी.एम. निकम, एम.टी. घोडके, एस.एम. बच्छाव, प्रकाश वाघ, एस.एम. बागुल, एस.ए. केरे, श्रीमती पुष्पा गांगुर्डे, डी.के. भुसारे, गोरख कुणगर आदिंनी केले आहे. (वार्ताहर)