आरोग्य विद्यापीठाच्या दोघांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:04+5:302021-02-05T05:44:04+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एक स्वयंसेवक व एक कार्यक्रम अधिकारी यांना राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनी कामगिरीसाठी राज्यस्तरीय ...

State level awards to both Health University | आरोग्य विद्यापीठाच्या दोघांना राज्यस्तरीय पुरस्कार

आरोग्य विद्यापीठाच्या दोघांना राज्यस्तरीय पुरस्कार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एक स्वयंसेवक व एक कार्यक्रम अधिकारी यांना राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनी कामगिरीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. यात विद्यापीठाशी संलग्न नाशकातील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. स्वानंद शुक्ल यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा पांढरपुरे हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांना एनएसएसच्या एककातील स्वयंसेवकांना राज्य शासनाकडून दरवर्षी पुरस्काराने गौरविण्यात येते. यात यावर्षी आरोग्य विद्यापीठाकडून सादर केलेल्या प्रस्तावांपैकी २०१९-२० शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. स्वानंद शल्क्ल व उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पूजा पांढरपुरे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

(आरफोटो-०१स्वानंद शुक्ल)

आरफोटो-०१पुजा पांढरपुरे)

Web Title: State level awards to both Health University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.