शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला आता मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:57 IST

महापालिकेतील बदल्या आणि पदोन्नत्या या प्रशासकीय नियमांपेक्षा राजकीय हस्तक्षेपानेच होत असतात. परंतु आता त्याला चाप लावण्यात येणार आहे.

नाशिक : महापालिकेतील बदल्या आणि पदोन्नत्या या प्रशासकीय नियमांपेक्षा राजकीय हस्तक्षेपानेच होत असतात. परंतु आता त्याला चाप लावण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही परिस्थतीत राजकीय नेते किंवा नगरसेवकांच्या हस्तक्षेपानुसार बदल्या होऊ नये अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा तो भंग ठरेल, असे आदेशच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले आहे.शासन किंवा महापालिका प्रशासनात बदल्या या अपवादानेच राजकीय हस्तक्षेपाशिवाय होतात. सनदी अधिकारी किंवा अगदी मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातही आमदार खासदार यांचा पुढाकार असतो आणि कोणत्या अधिकाºयाची कोणत्या आमदारांच्या माध्यमातून बदली झाली हादेखील चर्चेचा विषय असतो. महापालिकेत येणारे आयुक्तआणि उपआयुक्त, विविध अधिकाºयांच्या बदल्यांमध्येदेखील असाच राजकीय हस्तक्षेप असतो.शासनाचा भाग वेगळाच, परंतु महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर नगरसेवकांचीच चलती असते. सफाई कामगार, शिपायांपासून अगदी उपआयुक्तांपर्यंत कोणाची बदली कोठे करावी तसेच कोणाला कोणत्या विभागात सोयीचे पद द्यावेत यासंदर्भात नगरसेवक प्रशासनावर दबाव आणत असतात. कित्येकवेळा अशाप्रकारे सोयीचे बदली न झाल्यास संबंधित खाते प्रमुखावर दबाव टाकून आरोप-प्रत्यारोपदेखील केले जातात.बदलीच्या अशाही क्लुप्त्यामहापािलकेत एखाद्याची बदली करण्यासाठी केवळ वशिलाच लावला जातो असे नाही तर संबंधितांची त्या विभागात काम करायची इच्छा नसेल तर एखाद्या समितीच्या बैठकीत किंवा तसेही प्रशासनाकडे कामकाज योग्य नसल्याची तक्रार केली जाते आणि संबंधित अधिकाºयांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली जाते किंवा ठरावदेखील केला जातो. अशावेळी प्रशासन काय भूमिका घेणार हेदेखील महत्त्वाचे आहे.खाते प्रमुखांना दिले आदेशमध्यंतरी उच्च न्यायालयात बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप आणि दबावाबाबत एक याचिका दाखल झाली असून, त्यानुसार शासनाच्या सचिवांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार राजकीय हस्तक्षेपानुसार बदल्या होणार नाही, असे नमूद केले आहे. त्याचा आधार घेऊन शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना अवगत केले असून त्याचाच आधार घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व खातेप्रमुखांना आदेश दिले आहेत. राजकीय हस्तक्षेपाने बदली झाल्यास तो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारीPoliticsराजकारण