शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादी कॉँग्रेसचे राज्य सरकारला ५६ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:23 IST

भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नाशिक : भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात सोमवारी पक्ष प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, मोठे दावे करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोट्या आश्वासनांचे फुगे व अच्छे दिनचे निव्वळ बुडबुडे सोडून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये काहीच ठोस काम केलेले नाही. नोटबंदी, महागाई, इंधनाचे वाढते दर व यामुळे सर्वसामान्यांचे मोडलेले कंबरडे, कर्जाच्या खाईत ढकलेले राज्य, सतत ढासळत जाणारा कृषी विकासाचा दर, कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न, महिलांची सुरक्षितता, दीर्घकाळ प्रलंबित असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून हमीभावापर्यंतचे प्रश्न कायम आहेत. सरकारकडून सनातनी व जातीयवादींना पाठबळ मिळत असून, त्यामुळे संविधान व लोकशाहीची पायमल्ली होत आहे. अशा स्वरूपाचे ५६ प्रश्न सोशल मीडियासह इतर माध्यमातून सरकारला विचारले आहे. निम्म्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना केवळ धुलाई कामगार बनावे लागत आहे. त्यातच चार वर्षांची संधी वाया गेली आहे. बारा हजार कोटी जाहिरातींवर खर्च करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चार वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी म्हणजे निव्वळ पोकळ घोषणा, निष्क्रिय कारभार असून, भाजपाप्रणित नेतृत्वाखालील सरकार चौथा वर्धापनदिन साजरा करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठलीच वाढ झालेली नसल्याने या मुहूतार्ला ‘वर्धापनदिन’ का म्हणायचा? असा प्रश्न डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी विचारला आहे.भाजपा निरुत्तरसत्ताधारी ५६ इंच छातीवाल्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ५६ प्रश्न विचारण्यात आले असून, भाजपाचे अनेक नेते सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ते या मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करून एकाही मुद्द्याला एकही भाजपाच्या नेत्याने उत्तर दिले नसल्यामुळे जनतेसाठी हे प्रश्न खुले करण्यात आल्याचे पवार, ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकBJPभाजपा