संजय पडोळ यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार

By Admin | Updated: September 13, 2016 01:20 IST2016-09-13T01:19:21+5:302016-09-13T01:20:00+5:30

संजय पडोळ यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार

State Excise Farmers Award for Sanjay Padole | संजय पडोळ यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार

संजय पडोळ यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार

दिंडोरी : तालुक्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी संजय पडोळ यांना विश्वशांती केंद्र आळंदी व माईस एमआयटी शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
उनंदानगर येथील संजय पडोळ यांनी गेल्या दशकातील शेतीत केलेल्या प्रयोगाची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संजय पडोळ यांनी आपल्या शेतात उसाची आठ फुटी सरी, ड्रीपवर उसाची लागवड, यांत्रिक पद्धतीने पहिली ऊसतोड, हळद, आल्याचे व टरबुजाचे विक्र मी उत्पादन. डाळींब व मोसंबीची एकत्र लागवड असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविल्यामुळे त्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे निवड समितीने सांगितले.
यावेळी माईस एमआयटी शिक्षण संस्था पुणे चे अध्यक्ष विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष राहूल कराड, ग्रामसमृद्धी फौंडेशन चे अध्यक्ष योगेश पाटील उपाध्यक्ष प्रकश महाले आदी उपस्थित होते.

Web Title: State Excise Farmers Award for Sanjay Padole