महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

By Admin | Updated: August 25, 2015 23:44 IST2015-08-25T23:44:05+5:302015-08-25T23:44:05+5:30

महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

The State Council of Women's Deafness | महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

महिला कर्णबधिरांची राज्यस्तरीय परिषद

नाशिक : कर्णबधिर महिलांना सामाजिक सुरक्षा, स्थैर्य व आर्थिक स्वावलंबन प्राप्त व्हावे, यासाठी राज्यस्तरीय कर्णबधिर महिला सबलीकरण परिषद स्थापन होऊन त्यात विविध ठराव करण्यात
आले.
शासनाने कर्णबधिर कर्मचाऱ्यांना घोषित केलेला वाहनभत्ता देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी दिले.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात आयोजित महाराष्ट्रातील कर्णबधिर महिला सबलीकरण परिषदेचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सेलगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून रामदास चव्हाण, प्रकाश फडके, जयसिंग काळे, गोपाल बिरारे, सतीश गायकवाड हे होते.
कर्णबधिर व्यक्तींना सामाजिक उत्तेजनाअभावी जगणे अशक्य झाले असल्याने त्यासाठी ही परिषद घेण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी बोलताना भुजबळ यांनी हिंदीतून संवाद साधला व महिला मूकबधिरांचे प्रश्न, अडचणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करू व वाहनभत्ता देण्याचा निर्णय काढेपर्यंत सरकार दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
कर्णबधिर महिलांनी एकत्र येऊन आपल्या व्यथा मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्ष सेलगावकर यांनी केले. याप्रसंगी कविता काळे, ज्योती फडके, रेणू आहुजा, प्राजक्ता कुलकर्णी, पूजा कर्णिक, अनिता गायकवाड, मृणाल बाविस्कर, शिवलीला चौघुले, तस्लीम शेख, प्रियंका चव्हाण आदि उपस्थित होत्या. आमदार भुजबळ यांच्या हिंदीतील भाषणाचे मूक-कर्णबधिर खुणानुसार दुभाषक तस्लीम शेख यांनी करून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The State Council of Women's Deafness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.