शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरबन कॉलनी-कमोदनगर पादचारी भूमिगत मार्गाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:18 IST

दोन दिवसांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे जाताना उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांची दखल घेत शुक्रवारी सिडकोतील नागरिकांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर असा उड्डाणपुलाच्या खालून पादचारी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ अपघातातील मयत कुणालचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते करण्यात आला.

इंदिरानगर / सिडको : दोन दिवसांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे जाताना उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांची दखल घेत शुक्रवारी सिडकोतील नागरिकांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर असा उड्डाणपुलाच्या खालून पादचारी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ अपघातातील मयत कुणालचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते करण्यात आला.  कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि. २९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वर्षांपासून कमोदनगरजवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची मागणी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उड्डाणपूल ओलांडताना आतापर्यंत २५ हून अधिक लोकांचा बळी गेला. महामार्ग प्राधिकरणाला बोगदा तयार करण्यासाठी अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल उपस्थित करीत खासदार हेमंत गोडसे यांना सुमारे २०० हून अधिक महिलांनी घेराव घातला होता. महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाखालील पादचारी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात न केल्यास महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार देवयानी फरांदे यांनी कमोदनगरवासीयांची भेट घेतली व महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रशांत खोडस्कर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पादचारी भुयारी मार्गाचे काम तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यावर खोडस्कर यांनी, सुंदरबन कॉलनी समोरून भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर कमोदनगर येथे शेकडोच्या संख्येने जमलेल्या महिला व आमदार फरांदे, नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे आदींनी कमोदनगरपासून समांतर रस्त्याने पेठेनगर समोरील यू-टर्नची पाहणी करीत सुंदरबन कॉलनी समोरील भूमिगत कामाच्या ठिकाणी पोहोचले. दुसरीकडे सुंदरबन कॉलनी येथेही शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, शिवाजी चुंभळे, सागर पाटील, राजू बिलीव्ह, प्रदीप कोते, नाना दळवी, राजेंद्र देसाई, प्रदीप कोतवाल, ठोंबरे, धनंजय दळवी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी गोडसे यांचेही या ठिकाणी आगमन झाल्याने नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या.राजकारण्यांना टाळून तांबट यांना प्राधान्यसकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिडकोतून इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी येथे उड्डाणपुलाच्या खालून भुयारी पादचारी मार्ग करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे याठिकाणी आले असता नगरसेवक कल्पना पांडे व परिसरातील स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला. यांनतर कुणालचे वडील आशिष तांबट यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.भुयारी मार्गाला मयत कुणालचे नाव द्यावेउड्डाणपूल ओलांडताना झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकल्या कुणालसह त्याची आई शीतल तांबट यांचा दुर्दैवी मूत्यू झाला. त्यातूनच पादचारी भुयारी मार्गासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिल्याने शुक्रवारी सुंदरबन कॉलनी-कमोदनगर भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरू करण्याच्याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी भुयारी मार्गास मयत कोमलचे नाव देण्याची मागणी केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका