मनपा रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ
By Admin | Updated: April 29, 2017 01:22 IST2017-04-29T01:22:00+5:302017-04-29T01:22:09+5:30
मालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी येत्या २४ मे रोजी निवडणूक होत आहे. शनिवारपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे

मनपा रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ
मालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी येत्या २४ मे रोजी निवडणूक होत आहे. शनिवारपासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे. यासाठी सात ठिकाणी नामांकन अर्ज विक्री व दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहणार आहेत.
महापालिकेच्या २१ प्रभागातून ८४ उमेदवार निवडले जाणार आहेत. शनिवारपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. उमेदवारी याद्या निश्चित झाल्या नसल्यामुळे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या संख्येत वाढ होणार आहे.
शहराच्या पश्चिम भागात सात ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या पूर्व भागात कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस, तिसरा महाज, एमआयएम यांच्यात सरळ लढत होत आहे. तर पश्चिम भागात शिवसेना व भाजपामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. इच्छुकांच्या संख्येमुळे पक्षप्रमुखांची दमछाक होणार आहे. बंडखोरीचे ग्रहण सर्वच राजकीय पक्षांना लागण्याची चिन्हे दिसत आहेत.