आजपासून राम नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
By Admin | Updated: April 7, 2016 23:52 IST2016-04-07T23:47:28+5:302016-04-07T23:52:46+5:30
आजपासून राम नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

आजपासून राम नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
नाशिक : चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुक्रवार (दि.८)पासून सुरुवात होत असून, शहरात सर्वत्र गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. गुढीपाडव्याप्रमाणेच रामनवमीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर श्री काळाराम संस्थानतर्फे ‘वासंतिक नवरात्र महोत्सवाचे’ आयोजन (दि.८) पासून करण्यात आले आहे. या नवरात्र महोत्सवांतर्गत विविध विषयांवरील व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही भव्य रेलचेल असणार आहे.
या वासंतिक महोत्सवात शुक्रवारी (दि.८) कनकलता प्रतिष्ठान, नाशिकतर्फे ‘श्रीरामकृष्ण संगनृत्य नाटिका’ या विषयावर व्याख्यान, तर मीनल दातार (पुणे) यांच्या अभंग, भावगीत, नाट्यगीतांचा कार्यक्रम होणार असून शनिवारी (दि.९) डॉ. व्यंकट धर्माधिकारी (मुंबई) यांचे ‘आरोग्यासाठी आहार’, रविवारी (दि.१०) डॉ. शुभा साठे (नागपूर) यांचे महाकवी सावरकर, सोमवारी (दि.११) दामोदर मानकर यांचे ‘संताची संगत हीच दौलत’, मंगळवारी (दि.१२) प्रफुल्ल गणफुले (पुणे) यांचे आनंदमय जीवनाचा नादमय मार्ग, गुरुवारी (दि.१४) रामनाथ रावळ यांचे ‘पहिला बाजीराव पेशवा’ या विषयांवर व्याख्यान होणार आहे.
या नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत इंदोर येथील अभय माणके यांचे गीतरामायण तर ठाण्याच्या भावना लेले यांच्या कथक नृत्याचे गुरुवारी (दि.१४) सादरीकरण होणार असून, शनिवारी (दि.१६) नितीन वारे आणि नितीन पवार यांचा ‘अनुभूती स्वर- ताल नृत्याची’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी (दि.१५) दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून, रविवारी (दि.१०) सामूहिक रामरक्षास्त्रोत्र पठणाचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काळाराम संस्थानतर्फे देण्यात आली आहे.आढावा बैठकीत निर्णय : भाविकांच्या सोयीकरिता ट्रस्टच्या वतीने उपाययोजना; सीसीटीव्हींचीही राहणार नजरसप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवाला गुरुवार, दि. १४ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या पार्श्वभूमीवर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी गंगाशरण डी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी यात्रा कालावधीत मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तहसीलदार अनिल पुरे, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अग्रवाल, पोलीस निरीक्षक मधुकर गावित बैठकीला उपस्थितीत होते. बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यानच्या साडेतीन हजार पायऱ्यांचा पायी रस्ता, घाट रस्ता यासह सप्तशृंगगडाचा सर्व परिसर गृहीत धरून नियोजन करण्यात् आले आहे. तसेच भाविकांच्या अडीअडचणीसाठी नव्याने तात्पुरत्या स्वरूपात नांदुरी येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून, खासगी वाहनांना सप्तशृंग-गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीतर्फे कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल टाकून जलशुद्धीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या पायरीजवळ शौचालय कार्यान्वित करण्यात येणार आहे.
गावातील पथदीपांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात्रोत्सवा-दरम्यान नाशिक जिल्हा परिषद, पंचायत समिती, कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगगड, नांदुरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रदक्षिणा मार्ग यात्राकाळात बंद ठेवण्यात येणार आहे. वीज मंडळातर्फे २४ तास कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यात्रा कालावधीत भारनियमनही बंद ठेवण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला-पुरुष होमगार्ड, नागरिक संरक्षण दल, अग्निशमन दल आदि बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य परिवहन नाशिक विभागातून व कळवण आगारातून यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नांदुरी ते सप्तशृंगगडादरम्यान बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जळगाव, धुळे व इतर ठिकाणी जाण्या -येण्यासाठी बसेस उपलब्ध करून देणार आहेत. ऐन वेळेस भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध करून
देणार आहे. अपघाती वळणावर वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. भाविकांसाठी सप्तशृंगगडावरील धोंड्याकोंड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बसस्थानक उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)