खामखेडा : सटाणा-पिंपळदर-मांगबारी ते कळवणपर्यंत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.या रस्त्याची दुरवस्था झाली होती. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला होता. वाहनचालकांना या मार्गावरून खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे अपघातातदेखील वाढ झाली होती. याबाबत मांगबारी-पिंपळदर रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील प्रवास धोकादायक, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष याबाबत ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बांधकाम विभागाने या बातमीची दखल घेऊन साक्री-नामपूर-सटाणा-मांगबारी-खामखेडा-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य महामार्ग क्र.१७ असून, हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते; परंतु या महामार्गावरील पिंपळदर-मांगबारी घाटमाथा या तीन किलोमीटर व खामखेडा ते बेज हा सहा किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्कील झाले होते.यामुळे वाहनचालक वाहन चालविताना खड्डे टाळताना लहान-मोठे अपघात होत असे. या मार्गावरून नवापूर, नंदुरबार, धुळे आदी खान्देश भागातील भाविकांना सप्तशृंगगडावर जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते तसेच सापुतारा, नाशिक जाण्यासाठीसुद्धा हा रस्ता सोयीस्कर असल्याने या रस्त्यावरून नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.मांगबारी-पिंपळदर रस्त्याची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे यामार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले होते. खड्डे चुकविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दुरु स्तीला सुरु वात झाल्याने समाधान वाटते.- प्रवीण मोरे, खामखेडा
पिंपळदर-मांगबारी रस्त्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST
सटाणा-पिंपळदर-मांगबारी ते कळवणपर्यंत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पिंपळदर-मांगबारी रस्त्याच्या कामाला प्रारंभ
ठळक मुद्देप्रवाशांमध्ये समाधान : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दखल