दिंडोरी : तालुक्यातील निगडोळ येथील महादेव मंदिराकडील जुन्या ननाशी रोडवरील पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. सदर कामाचा शुभारंभ अफ्रो संस्थेचे प्रकल्प समन्वयक ईश्वर किराडिया कृषी अभियंता संदीप काकड व निगडोळच्या सरपंच इंदू राऊत, उपसरपंच शरद मालसाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसरपंच शरद मालसाने यांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यात निगडोळ ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती सिंचनासाठीचा प्रश्न बऱ्याचअंशी मार्गी लागणार असून, या पाझर तलाव दुरुस्तीसाठी परनार्ड रिकार्ड इंडिया फाउण्डेशन आणि अफ्रोने व ग्रामपंचायत निगडोळ यांनी जो काही निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी सरपंच विजय राऊत, बबनराव मालसाने, मधुकर मालसाने, अलका रहेरे, पुंडलिक भोये, वाय. के. थविल, रंगनाथ मालसाने, निवृत्ती मालसाने, भाऊसाहेब मालसाने, बाबूराव मालसाने, मनोहर राऊत, संजय मालसाने, सोमनाथ रहेरे, सुरेश रहेरे, सतीश मालसाने, एकनाथ मालसाने, राजाराम मालसाने उपस्थित होते.
पाझर तलाव दुरु स्तीच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST